गरोदरपणात मासे खावे की खाऊ नये

 गरोदरपणात मासे खावे की खाऊ नये याची माहिती या व्हिडिओत सांगितली आहे.


प्रेग्नेंसीमध्ये मासे खातात का?

गरोदरपणात मासे खाणे चांगले असते. माशांमध्ये प्रोटीन, ओमेगा थ्री फॅटी ऍसिड, आयोडीन, झिंक, आणि सेलेनियम यासारखी पोषक तत्त्वे असतात जी गर्भवती आणि गर्भाच्या आरोग्यासाठी आवश्यक असतात.




गरोदरपणात मासे खाल्याने काय फायदे होतात?

माशांमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असते, जे गर्भाच्या विकासासाठी आवश्यक असते. प्रोटीनपासून गर्भाच्या स्नायू, हाडे, त्वचा, आणि केस तयार होतात.


माशांमध्ये ओमेगा थ्री फॅटी ऍसिड असते. ते गर्भाच्या मेंदू आणि मज्जासंस्थेच्या विकासासाठी आवश्यक असतात. यामुळे गर्भाची स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढण्यास मदत होते.


माशांमध्ये आयोडीन देखील असते. आयोडीन हे गर्भाच्या मेंदू आणि थायरॉईड ग्रंथीच्या विकासासाठी आवश्यक असते.


तसेच माशांमध्ये झिंक व सेलेनियम हे घटकही असतात. झिंकमुळे गर्भाची प्रतिकारशक्तीसाठी सुधारते तर सेलेनियम हे गर्भाच्या मेंदूच्या विकासासाठी आवश्यक असते.





गरोदरपणात कोणते मासे खावे?

गरोदरपणात सुरमई, पापलेट, बांगडा, कोळंबी असे मासे खाऊ शकता. या माशांमध्ये पारा म्हणजेच मर्क्युरीचे प्रमाण कमी असते. असे मासे खाणे गरोदरपणात सुरक्षित असते.



गरोदरपणात कोणते मासे खाऊ नये?

गरोदरपणात शार्क, ट्यूना फिश, स्वॉर्ड फिश, किंग मेकरेल आणि कॅटफिश असे मासे खाऊ नयेत. कारण या माशांमध्ये पारा जास्त प्रमाणात असतो, जो गर्भाच्या विकासासाठी हानिकारक ठरू शकतो.



गरोदर स्त्रीने कधी मासे खाऊ नयेत?

जर गरोदर स्त्रीला मासे खाल्ल्याने एलर्जीचा त्रास होत असल्यास मासे खाऊ नयेत. गरोदर स्त्रीला हाय ब्लड प्रेशरचा त्रास असल्यास मासे खाणे टाळावे.



गरोदरपणात मासे खाताना काय काळजी?

गरोदरपणात दररोज व जास्त प्रमाणात मासे खाऊ नयेत.

आठवड्यातून केवळ दोन ते तीन वेळाचं मासे खावेत.

मासे पूर्णपणे शिजवल्याची खात्री करा. मासे कच्चे, अर्धवट शिजवलेले खाऊ नका.

गरोदरपणात मासे खाताना ही काळजी घेतली पाहिजे. अशी उपयुक्त माहिती डॉक्टरांकडून जाणून घेण्यासाठी आमचे चॅनेल 'Subscribe' करा व व्हिडिओ 'लाईक' करा.









गरोदरपणात मासे खाणे हे एक आरोग्यदायी पर्याय आहे. मात्र, मासे खाताना सुरक्षिततेच्या बाबींची काळजी घ्यावी.









गरोदरपणात कोणते मासे खावे : डॉ सतीश उपळकर | pregnancy madhe konte fish khave in Marathi


गरोदरपणात मासे खाणे हे एक आरोग्यदायी पर्याय आहे. मात्र, मासे खाताना सुरक्षिततेच्या बाबींची काळजी घ्यावी लागते. यासाठी गरोदरपणात कोणते मासे खावे याची माहिती डॉ सतीश उपळकर यांनी या व्हिडिओमध्ये सांगितली आहे.


00:00. प्रेग्नेंसीमध्ये मासे खातात का?

00:00. गरोदरपणात मासे खाल्याने काय फायदे होतात?

00:00. गरोदरपणात कोणते मासे खावे?

00:00. गरोदरपणात कोणते मासे खाऊ नये?

00:00. गरोदर स्त्रीने कधी मासे खाऊ नयेत?

00:00. गरोदरपणात मासे खाताना काय काळजी?


Contact Our Medical Expert :-

General Physician : Dr. Satish Upalkar

Education : Bachelors in Medical Degree from Maharashtra University of Health Science, Nashik and is also a member of the Medical Council of Indian Medicine,

Qualification : B.A.M.S. (Bachelor of Ayurvedic Medicine and Surgery), D.Y.A.B. (Diploma in Yoga & Ayurveda), Certificate course in Obstetrics and Nutrition.

Medical Council Registration number : I-72800-A

Email id : dr.satish@healthmarathi.com

Website : www.healthmarathi.com


#DrSatishUpalkar

#HealthMarathi

#HealthMarathiChannel








गरोदरपणात कोणते मासे खावे,

pregnancy madhe konte fish khave,

pregnancy madhe fish khatat ka,

प्रेग्नेंसीमध्ये कोणते मासे खावे,

गरोदरपण,

Pregnancy,

Dr Satish Upalkar,

Physician

s,

Medical council registration number: I-72800-A,

Health Marathi,

Health Marathi channel,

Comments